Coronavirus: देशात सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा तीन हजार पार, तर नवीन कोरोना बाधित…

Coronavirus: देशात कोरोना रुग्णांची (Corona Cases In India) संख्या कमी आहे

0

नवी दिल्ली,दि.26: देशात कोरोना रुग्णांची (Corona Cases In India) संख्या कमी आहे. मात्र अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus Outbreak) पाहायला मिळत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. देशात आज 196 नवे रुग्ण आढळले असून मागील 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा तीन हजार पार पोहोचला आहे. भारतातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. ही चांगली बाब असली तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे तसेच बूस्टर डोस घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा Nagpur: महाराष्ट्रातील या ठिकाणी मास्क बंधनकारक; प्रशासनाचे आदेश

केंद्र सरकार सतर्क | Corona Cases In India

सध्या देशात नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचे प्रमाण कमी आहे, पण इतर देशांमधील कोरोना परिस्थितीनुसार वाढता धोका पाहता केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आवश्यक पाऊले उचलली जात आहेत. देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य प्रशासनाकडून दिल्ली विमानतळावर 500 हून अधिक प्रवाशांची रँडम कोविड चाचणी घेण्यात आली. सरकारकडून जीनोम सिक्वेंसिंग आणि RT-PCR चाचण्यांवर भर दिला जात आहे.

जाहिरात

चीन, जपानसह इतर देशांमध्ये कोरोनाचा कहर | Coronavirus

चीनमध्ये सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये दिवसागणिक लाखो नवीन रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळो होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. चीनसह जपान आणि अमेरिकेतही कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य | Coronavirus India News

जगभरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार अलर्टवर आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here