Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिल्या सूचना, राज्य सरकारने घेतला हा निर्णय

0

मुंबई,दि.10: देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येच्या (Corona Cases In India) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्या होत्या. केंद्राने राज्यांना एकूण सक्रिय रुग्णांची संख्या, रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट स्थिती यावर दररोज लक्ष ठेवण्यास सांगितले. देशातील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सरकारने राज्यांना सूचना जारी केली आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. राज्यात आढळणाऱ्या जास्त रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही. जास्त रुग्णांना लक्षण नाहीत, लक्षणं असणाऱ्य रुग्णांची संख्या कमी आहे. होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन हेल्थ कीट देणार आहेत, त्यात सॅनिटायझर, 10 मास्क, माहिती पुस्तिका, 10 पॅरासिमॉल टॅबलेट, 20 मल्टी व्हिटॅमिनच्या टॅबलेट असणार आहेत, तशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच क्वारंटाईन काळ हा सर्व राज्यात सात दिवसांचाच राहणार आहे. अशी माहिती टोपेंनी दिली आहे.

रुग्णांना करण्यात येणार फोन

ज्या रूग्णांना क्वारंटाईन करण्यात येईल अशा रुग्णांना फोन करून माहिती घेतली जाईल असे राजेश टोपे यांनी सांगितले. कॉल सेंटरवरून ही प्रक्रिया पार पडणार आहे. रुग्णांची विचारपूस कॉलद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णाला अडचण आल्यास त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावं यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, तसेच डॅशबोर्ड तयार करून रुग्णांना सर्व माहिती व्यवस्थित मिळावी याची खबरदारी घेतली जाणार, यात रुग्णांना बेड आणि औषधांबाबत माहिती मिळणार आहे.

ऑक्सिजन निर्मितीचे 404 प्लांट सुरू झाले आहेत, येणाऱ्या आठ ते दहा दिवसात आणखी 100 प्लांट सुरू होणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. बेड व्हेंटिलेटची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. ईसीआरटीटू च्या माध्यामातून केंद्र सरकारकडून काही निधी देण्यात आल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. तसेच केंद्राने कलेक्टर लेवलला परवानगी देऊन खर्च करण्यात यावा अशी मागणी केल्याचेही सांगितले. आरोग्य विभागाकडून टेंडर काढली आहेत, त्यामुळे लवकरच निधीच्या खर्चाचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लसीकरणात महाराष्ट्रात आणखी वेग वाढण्याची गरज आहे, असे मत केंद्राकडून नोंदवण्यात आले आहे, त्यामुळे लसीकरण आणखी वेगवान होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here