दि.१०: Corona: कोरोनावर (Covid-19) अनेक संशोधने व अभ्यास केला जात आहे. कोरोनावरील उपचारासाठी अभ्यासातून नवीन माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेकांचा मृत्यू झाला. कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. देशात अनेकांचे लसीकरण (Vaccination) पूर्ण झाले आहे. लसीकरण हेच सध्या कोरोनाविरुद्ध प्रभावी हत्यार आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वैज्ञानिकांनी लस विकसित केली. त्यानंतर आता हळूहळू कोरोनावरील उपचारात औषधं बाजारात येऊ लागली आहेत. कोरोना (Coronavirus) उपचारासाठी भारतात झालेल्या एका नव्या अभ्यासातून दिलासा मिळणारी माहिती आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध नाइट्रिक ऑक्साइड एक यशस्वी आणि किफायतशीर गेम चेंजर उपचार सिद्ध होऊ शकतो.
कोची येथील अमृता रुग्णालयातील डॉक्टर आणि अमृता विश्व विद्यापीठातील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि संशोधकांनी सांगितले की, नाइट्रिक ऑक्साइड वास घेतल्यानं नाकातील कोरोना मारण्यास मदत होते. इंफोक्शियस माइक्रोब्स अँड डिजीज जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. नायट्रिक ऑक्साईडने कोरोना विषाणूचा खात्मा केला. इतकेच नाही तर ते शरीरातील पेशींशी विषाणूच्या प्रभावापासून रोखू शकते असंही संशोधकांना संशोधनात आढळलं.
याआधीही या कामात व्हायचा वापर
माहितीनुसार, नाइट्रिक ऑक्साइडचा वापर अनेक वर्षांपासून ब्लू बेबी सिंड्रोम, फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण यासारख्या वैद्यकीय स्थिती असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते.
NBT मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, अमृता स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे प्रोफेसर बिपिन नायर यांनी सांगितले की, NO ला कोविड-19 साठी उपचार पर्याय म्हणून पाहिले पाहिजे. एका स्वीडिश गटाने केलेल्या अभ्यासातून आम्हाला ही कल्पना मिळाली. हा चमत्कारी वायू SARS-Co-2 विषाणूला रोखण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो. कारण ते विषाणूच्या स्पाइक प्रोटीनवर थेट परिणाम करणारे बायोकेमिकल बदल घडवून आणतात अशी शिफारस रिपोर्टमध्ये दिली आहे.
Home संशोधन आणि अभ्यास Corona: याचा वास घेतल्यानं नाकातील कोरोना विषाणू होणार नष्ट, नवीन अभ्यासातून माहिती...