Corona: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निर्बंध आणखी कठोर होणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ही माहिती

0

मुंबई,दि.९: Corona: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In Maharashtra) वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर काल (शनिवारी) कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

राज्यातील ऑक्सिजनची मागणी २७० मेट्रिक टनवरुन ३५० मेट्रिक टन इतकी झाली आहे. मात्र, हे कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनचे प्रमाण आहे. राज्यात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध हे मोठ्या स्वरुपाचे आहेत. रुग्णसंख्या कितीही वाढली तरी जोपर्यंत ऑक्सिजन आणि रुग्णालयांतील खाटांची मागणी एक निर्धारित मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत हे निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नाही. किंबहुना याच निर्बंधांमुळे राज्यातील करोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात येईल, अशी आशा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केली. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी राजेश टोपे यांना राज्यातील कोरोनाच्या सद्यपरिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर राजेश टोपे यांनी म्हटले की, सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी २७० मेट्रिक टनवरुन ३५० मेट्रिक टन इतकी झाली आहे. मात्र, हे कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनचे प्रमाण आहे. यापूर्वी करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण दिवसाला लागणाऱ्या १७०० ते १८०० मेट्रिक टनची मागणी पूर्ण केली आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यावरुन सध्याचा करोना विषाणू सौम्य स्वरुपाचा वाटत आहे, असे राजेश टोपे यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here