ठाणे,दि.४: आश्रमशाळेतील २८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रमशाळेतील २८ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ३ जानेवारीपासून सरकारने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
ओमिक्रॉनची (Omicron) व कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कमी होत असलेली रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू झाले आहे. भिवंडी येथील चिंबीपाडा परिसरातील एका आश्रमातील २८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच भीतीचे वातावरण पसरले आहे.
या २८ कोरोना बाधित विद्यार्थी व या आश्रम शाळेतील दोन कर्मचारी असे एकूण ३० जणांना कोरोनाची लागण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.. या आश्रमशाळेतील मुलांना सर्दी, तापाची लक्षणे आढळून आल्याने चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी १९८ विद्यार्थ्यांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली त्यात हे २८ विद्यार्थी आणि २ कर्मचारी असे ३० जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.