खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोवरून वाद

0

दि.१५: सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. अनेकजण श्रावण महिन्यात मांसाहार करत नाहीत. हिंदू धर्म परंपरेनुसार श्रावण महिन्याला मोठे महत्व आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असतात. अनेक प्रकारचे फोटो सुप्रिया सुळे शेअर करत असतात. अशात आता काही फोटो सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

आपल्या विविध दौऱ्याचे आणि उपक्रमाचे फोटो सुप्रिया सुळे फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करतात. मात्र, त्यांनी शेअर केलेला फोटो सध्या वादाचा मुद्दा बनला आहे. इंदापूर येथील एका हॉटेलमध्ये डिनर केल्यानंतरचा त्यांनी फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, नॉन व्हेजेटेरियन पदार्थांच्या डिशेस दिसून येतात. मांसाहारी पदार्थांची मेजवाणी केल्याचं त्यांनी या फोटोतून सांगितलं आहे. आता, नेटीझन्से या फोटोवरुन सुप्रिया सुळेंना ट्रोल करत प्रतिप्रश्न केला आहे. 

सध्या श्रावण महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात हिंदु संस्कृती आणि परंपरेनुसार अनेकजण मांसाहार वर्ज्य करतात. बहुतांशजण श्रावणच्या सोमवारी मांसाहार करत नाही, तर अनेकजण महिनाभर हा श्रावण पाळतात. या महिन्यात भगवान शिव शंकर, भोलेनाथ यांची पूजा केली जाते. 

मात्र, सुप्रिया सुळे यांनी रविवारी रात्री उशिरा आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन मांसाहारी पदार्थाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, मच्छी फ्रायसह इतरही पदार्थ दिसून येतात. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या असून सुप्रिया सुळे यांना श्रावण महिन्यात मांसाहार केल्याबद्दल प्रश्न विचारले आहेत. तर, काहींनी विनायक मेटेंच्या निधनाचाही दाखला दिला आहे. किमान त्यांच्यावर अंत्यसंस्कार तरी होऊ द्यायचे होते, असे म्हणत या फोटोवरुन सुप्रिया सुळेंवर टिका केली आहे. 

काही युझर्सनी अमृता फडणवीस यांच्यावरही टीका करत कमेंट केली आहे. Arvind Petkar या यूजरने म्हटले आहे की,”Manisha Mundhe-Wagh थोडा अमृता फडणवीस यांना पण हिंदू धर्म समजावून सांगत चला त्या पण कुंकू लावत नाही आणि मंगळसूत्र पण गळ्यात घालत नाही.आणि खाणे पिणे हे ज्याची त्याची खाजगी बाब आहे त्याचा धर्माशी काय संबंध?”

एका युजर्सने म्हटले आहे की,”अमृता फडणवीस बाबत पण बोलला असता तर बरं झालं असतं… मंगळसूत्र घातल्याने त्यांचा गळा आवळून येतो …हे हिंदू धर्मात चालत का….का फक्त खाण्यावरूनच कळतो ….so called गरजेपुरते हिंदुत्व”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here