वाघोली,दि.१२ः मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील वाघोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तानाजी रायगोंडा पाटील तर व्हाइस चेअरमनपदी संजय हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी इतर संचालकांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. सर्वांचे वाघोलीचे माजी सरपंच मुकुंद पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
या वेळी संजय पाटील, नानाजी फाळके, हरी कोरे,अशोक वाघमारे,गंगाधर होनराव, बसवेश्वर गिराम, शंकर गावडे, विजयकुमार कोरे, सिंधू वाघमारे,राजश्री मसरे, रेखा अशोक पाटील, या सर्वांची संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जे.पी.ठाकरे यांनी घोषित केले. संस्थेचे सचिव अप्पू पाटील यांनी निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यात भुमिका निभावले. यावेळी पॅनल प्रमुख माजी सरपंच मुकुंद पाटील उपसरपंच तानाजी पवार ग्रा. सदस्य तानाजी शिवशेट्टी, मंगेश गावडे, गावातील प्रतिष्ठित नागरिक बाबासाहेब पाटील, कोंडीबा पाटील, यशवंत बेडगे, गणेश राजमाने, रविकिरण पतंगे, संजय पाटील, प्रल्हाद फाळके, कडप्पा गावडे, नागनाथ शेंडे, नेताजी वाघमारे, दादा अंकुशराव, समाधान चंदनशिवे, महादेव चंदनशिवे, दगडू मानके, बाळू कुलकर्णी, संजय कुंभार, राजू कोरे, श्रीमंत कोरे, राजू बळवंतराव आदी ग्रामस्थ व मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते.
मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वाघोलीचे माजी सरपंच मुकुंद पाटील यांनी सोसायटी निवडणुक बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले.