महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे कारस्थान? पोलिसांनी जप्त केल्या ८९ तलवारी

0

धुळे,दि.२८: पोलिसांनी मोठी कारवाई करत ८९ तलवारी जप्त केल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे कारस्थान तर चालू नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजस्थानातील चितोडगड येथून जालना येथे शस्त्रास्त्रे नेणाऱ्या चौघांना मुंबई आग्रा महामार्गावर गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांनी बुधवारी सकाळी ७ वाजता पाठलाग करून पकडले. त्यांच्या वाहनातून तब्बल ८९ तलवारी आणि एक खंजीर जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जालना येथील चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्याने महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट तर सुरू नाही ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सोनगीर पोलिसांना वाघाडी फाट्याजवळ शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी संशयास्पद कार नजरेस पडली. पोलिसांनी कारसह सुमारे ७ लाख १३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मोहम्मद शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियास शेख लतिफ, सय्यद रहिम आणि कपिल विष्णू दाभाडे या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १८४, २३९, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट – भाजपा

महाराष्ट्रात धुळ्यात ८९ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. ज्या राजस्थानात काँग्रेसचं सरकार आहे त्याठिकाणाहून धुळ्यात या तलवारी आल्या आहेत. जालनाला या तलवारी पाठवण्यात येणार होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कशाला? कुणाला दंगल घडवायची आहे? महाराष्ट्रात तलवारी पाठवणारे राजस्थानमधील कोण लोक आहेत? या प्रकरणाच्या खोलवर तपास केला पाहिजे. ठाकरे सरकार ही चौकशी करणार का? असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here