काय ते देशहिताचे प्रश्न, काय ती जनहिताची उत्तरे, काय ती पंतप्रधान निवासातील मुलाखत, एकदम ओक्के

0

दि.27: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीनंतर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर आधी शिवसेना नेत्यांवर आरोप केल्याचा आणि नंतर त्याच नेत्यांना आपल्यासोबत घेऊन पुण्यवान केल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरींचा उल्लेख केला. गडकरी म्हणाले होते की आमच्याकडे वॉशिंग मशिन आहे, असं म्हणत ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला. ते बुधवारी (27 जुलै) सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

भाजपा नेत्या चित्रा वाघांनी “काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत. कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के,” असं म्हणत खोचक टोला लगावला. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका मुलाखतीचा जुना व्हिडीओ पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं.

सचिन सावंत यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीचा एक भाग आहे. यात अक्षय कुमार मोदींना तुम्ही आंबा खाता का? खात असतील तर कापून खातात की चोखून खातात, असा प्रश्न विचारला आहे. यावर मोदी हसताना दिसत आहे.

याशिवाय या व्हिडीओत अन्य एका मुलाखतीचा भाग आहे. ज्यात पत्रकार तुम्ही तुमच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवतात का? असा प्रश्न विचारताना दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here