काँग्रेस आमदाराच्या मुलाने केली स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

0

दि.12: काँग्रेस आमदाराच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संजय यादव यांच्या अल्पवयीन मुलाने स्वतःवर गोळी झाडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आमदार पुत्राला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आमदाराच्या घरातच त्यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडली. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. बरगी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचं हाथी ताल कॉलनीत घर आहे. त्यांच्या घरात दुपारी गोळीबाराचा आवाज आला. घरातील सदस्यांनी धाव घेतली तर आमदारांचा मुलगा विभु यादव हा आपल्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

धक्कादायक घटनेची माहिती मिळताच शहरातील काँग्रेस नेते रुग्णालयामध्ये आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभुने घरामध्ये असलेल्या बंदुकीतून गोळी झाडली आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. पण त्यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रुग्णालयाच्या बाहेर सध्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here