विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0

मुंबई,दि.24: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांना या यादीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीत ठाकरेंनी 65, पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 आणि आता काँग्रेसकडून 48 जणांना उमेदवारी घोषित केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी (23 ऑक्टोबर 2024) जाहीर केली. त्यानंतर आज (24 ऑक्टोबर 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या 45 तर काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

एकीकडे भाजप हे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडमध्ये मागीला काही दिवस हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच होतं. पण आता काँग्रेसने शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासह महायुतीला टक्कर देण्याची तयारी केली आहे. 

काँग्रेसचे उमेदवार

अक्कलकोट – सिद्धाराम म्हेत्रे

अक्कलकुवा – ॲड. के.सी. पाडवी

शहादा- राजेंद्रकुमार गावित

नंदुरबार – किरण दामोदर तडवी

नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक

साक्री – प्रविण बापू चौरे

धुळे ग्रामीण-  कुणाल रोहिदास पाटील

रावेर- ॲड. धनंजय शिरीष चौधरी

मलकापूर- राजेश पंडितराव एकाडे

चिखली- राहुल सिद्धिविनायक बोंद्रे

रिसोड- अमित सुभाषराव झोनक

धामणगाव रेल्वे-  विरेंद्र जगताप

अमरावती-  डॉ. सुनील देशमुख

तिवसा- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर

अचलपूर- अनिरुद्ध देशमुख

देवळी – रणजीत कांबळे

नागपूर दक्षिण पश्चिम- प्रफुल गुडधे

नागपूर मध्य – बंटी शेळके

नागपूर पश्चिम- विकास ठाकरे

नागपूर उत्तर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत

साकोली- नाना पटोले

गोंदिया- गोपालदास अग्रवाल

राजुरा- सुभाष धोटे

ब्रह्मपुरी- विजय वडेट्टीवार

चिमूर- सतीश वारजूकर

हदगाव – महादेवराव पवार पाटील 

भोकर – तिरुपती बाबूराव कदम कोंडेकेर

पाथरी – सुरेश वडपुरकर

नायगाव- मीनल पाटील

फुलंब्री- विलास औताडे

मीरा भाईंदर- सय्यद मुजफ्फर हुसेन

मालाड पश्चिम – अस्लम शेख

चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान

धारावी – ज्योती एकनाथ गायकवाड

मुंबादेवी- अमिन पटेल

पुरंदर- संजय जगताप

भोर – संग्राम अनंतराव थोपटे

कसबा पेठ- रवींद्र धंगेकर

संगमनेर- बाळासाहेब थोरात

शिर्डी-  प्रभावती घोगरे

लातूर ग्रामीण- धीरज विलासराव देशमुख

लातूर शहर- अमित देशमुख 

कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज पाटील

करवीर- राहुल पाटील

हातकणंगले -राजू आवळे

पलूस-कडेगाव- विश्वजीत कदम

जत – विक्रमसिंह सावंत


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here