मुंबई,दि.21: Comedian Raju Srivastav Passes Away: कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav) यांचं निधन झालं (Comedian Raju Srivastav Passes Away) आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केलं होतं. आज त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावल्यानं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. हिंदी सिनेसृष्टीत अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा निर्माण झाली असून सर्व स्थरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूपश्यात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.
राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती. ब्रेन डॅमेज झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांना उपचारांती व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
राजू श्रीवास्तव यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव हे कवी होते. राजू लहानपणापासून मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियनच व्हायचं होतं. टीव्ही शो, कॉमेडी शो अवॉर्ड होस्ट करण्यापासून त्यांची सुरुवात झाली.
मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच ‘बिग बॉस 3’, ‘नच बलिए’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू ॲक्टिव्ह होते. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा श्रीवास्तव या गेल्या काही दिवसांपासून राजू यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती देत होत्या. तसेच राजू यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राजू यांच्या तब्येतीबाबत माहिती देत होते. राजू श्रीवास्तव यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव यांना अनेक सेलिब्रीटी श्रद्धांजली वाहत आहेत.








