मुंबई,दि.5: CNG Bike: बजाज ऑटो ने जगातील पहिली सीएनजी बजाज फ्रीडम Bajaj Freedom आज अधिकृतपणे विक्रीसाठी लॉन्च केली आहे. आजपर्यंत कोणत्याही कंपनीने केले नाही ते बजाज कंपनीने करू दाखवले आहे. या ऐतिहासिक मोटारसायकलच्या लाँचिंगला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते, त्यांनी या मोटरसायकलला गेम चेंजर म्हटले. आकर्षक लुक आणि स्पोर्टी डिझाईनने सुसज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
जगातील पहिली CNG Bike कशी आहे?
बजाज ऑटोने ही बाईक कम्युटर सेगमेंटमध्ये लॉन्च केली आहे. पण टीमने या बाईकच्या लुक आणि डिझाईनवर उत्तम काम केले आहे. ही बाईक पहिल्या नजरेत पाहिल्यावर तुमच्या मनात पहिला प्रश्न येईल तो म्हणजे CNG सिलेंडर. या बाईकला पाहून तुम्हाला अंदाजही येणार नाही की कंपनीने या बाईकमध्ये सीएनजी सिलिंडर कुठे ठेवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याचे कौतुक केले.
डिझाईनच्या बाबतीत, बजाजने फ्रीडम 125 साठी किमान पण मजबूत डिझाइन भाषा वापरली आहे. यात पूर्णपणे एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स तसेच हॅलोजन इंडिकेटर आहेत. यात मोनोक्रोम एलसीडी डिस्प्लेसह एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतो. बजाजने इंधन टाकीवर एक सामान्य फ्लॅप दिला आहे, जो उघडून तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही रिफिल करू शकता.
सीएनजी सिलेंडर कुठे आहे
बजाज ऑटोचा दावा आहे की या बाईकमध्ये विभागातील सर्वात लांब सीट (785MM) आहे जी समोरील इंधन टाकीला मोठ्या प्रमाणात कव्हर करते. या सीटखाली सीएनजी टाकी ठेवण्यात आली आहे. यामध्ये हिरवा रंग CNG आणि नारंगी रंग पेट्रोलचे प्रतिनिधित्व करतो. या बाईकला एक मजबूत ट्रेलीस फ्रेम देण्यात आली आहे ज्यामुळे बाईक फक्त हलकीच नाही तर ती मजबूत देखील होते. कंपनीचे म्हणणे आहे की या बाईकने उद्योगातील 11 वेगवेगळ्या चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत ज्यामुळे ती पूर्णपणे सुरक्षित आहे. या बाइकची समोरून, बाजूने, वरून आणि अगदी ट्रकखाली चिरडूनही चाचणी घेण्यात आली आहे.
पॉवर, परफॉर्मन्स आणि मायलेज
जगातील पहिली CNG बाइक असलेल्या बजाज फ्रीडममध्ये कंपनीने 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 9.5PS पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये कंपनीने 2 लिटर पेट्रोल इंधन टाकी आणि 2 किलो क्षमतेची सीएनजी टाकी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक पूर्ण टाकीमध्ये (पेट्रोल + CNG) 330 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही बाईक 1 किलो सीएनजीमध्ये 102 किमी आणि 1 लिटर पेट्रोलमध्ये 67 किमी मायलेज देते.
स्विचसह मोड बदलेल
ही बाईक पेट्रोल आणि CNG दोन्ही मोडमध्ये चालवता येते. यासाठी कंपनीने हँडलबारवर एक स्विच दिला आहे. ज्यामध्ये मोड बदलण्याचे बटण उपलब्ध आहे. म्हणजे फक्त एक बटण दाबून तुम्ही पेट्रोलमधून CNG मोडमध्ये बदलू शकाल. बाईकमध्ये दिलेल्या सीएनजी सिलेंडरचे वजन 16 किलो आहे, तर सीएनजी भरल्यानंतर ते 18 किलो होते. बजाज फ्रीडमचे एकूण वजन 147 किलो आहे, जे CT125X पेक्षा सुमारे 16 किलो जास्त आहे.