मुंबई, दि.26: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच बारसू रिफायनरीचा वाद पेटला आहे. आज शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी फोनवर चर्चा
बारसू रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात राजकीय वातावरण पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहे. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची फोनवरून बारसू ग्रीन रिफायनरी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का, याची तपशील गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निमित्ताने होती अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी उदय सामंत यांच्यासोबत रिफायनरीवरून सुरू असलेल्या वादावरही चर्चा झाल्याचं सांगितलं.
शरद पवार म्हणाले की, उद्योग मंत्र्यांनी दोन गोष्टी सांगितलं. बारसू इथं आंदोलनावेळी पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याची माहिती समजली.
लोकांना समजून सांगितल्यावर विरोध नाही असंही सामंत यांनी सांगितलंय. बारसूबाबत काही घाईने करू नका असा सल्ला शरद पवार यांनी उदय सामंत यांना दिला. तसंच उद्या आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करू असं आश्वासनही पवारांनी दिलं.








