मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा आमदाराला म्हणाले, नाहीतर घरी बसावे लागेल…

0
CM Devendra Fadnavis

नागपूर,दि.९: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. राज्यातील प्रत्येक समस्येला लाडकी बहिण योजनेशी जोडणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले. औसा येथील भाजपा आमदार अभिमन्यू पवार (MLA Abhimanyu Pawar) यांना देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत समज दिली. लाडकी बहीणचा उल्लेख यासाठी कारणीभूत ठरला. Z24 तासने याबाबत वृत्त दिले आहे. 

भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी सभागृहात अवैध दारुचा मुद्दा मांडला. राज्यात लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या ही अवैध दारू विक्री असल्याचे अभिमन्यू पवार यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी ही लाडक्या बहिणींची समस्या असल्याचं म्हटलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीत आणू नका अशा शब्दांत समज दिली. 

“मला अवैध दारुचा मुद्दा मांडायचा आहे. मागच्या सरकारमध्ये आणि आता अशा दोन लक्षवेधी मांडल्या. तुमच्या दालनात तीन बैठका झाल्या. पण अद्यापही कारवाई झालेली नाही. हा सामाजिक विषय असून, प्रत्येक आमदाराचा आहे. ग्रामीण भागातील आमदारांना रोज त्रास होत आहे. कुठेही गेलो तरी आम्हाला अवैध दारुबद्दल विचारतात. आपण लाडक्या बहिणी म्हणतो, पण लाडक्या बहिणीचं काही दु:ख असेल तर अैध दारुवर आळा घालण्याचं दु:ख आहे,” असं अभिमन्यू पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here