‘…ही अफवा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये’ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

0

सोलापूर,दि.19: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याबाबत अफवा पसरवली जात आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंतप्रधान यांचा दौरा होणार नाही ही अफवा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

गुजरात राज्यात काही अनुचित प्रकार झालेला आहे, त्यामूळे सोलापूर जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले.

तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पंतप्रधान महोदय यांचा शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी सोलापूर येथील रे नगर गृहप्रकल्प वितरण कार्यक्रम पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. 

पंतप्रधान महोदय यांचा दौरा रद्द झाल्याच्या आफवाववर कोणीही नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पंतप्रधान महोदय यांच्या दौऱ्यातील सोलापूर येथील सर्व कार्यक्रम पूर्व नियोजनाप्रमाणे पार पडतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here