आधारच्या डेटाबेसवर चिनी हॅकर्सनी केला हल्ला, अमेरिकेतल्या एजन्सीने दिली माहिती

0

दि.23 : आधार कार्ड (Aadhar Card) हे महत्वाचे आहे. सर्व सरकारी कामात याची गरज लागते. प्रत्येक आधार कार्ड धारकाची माहिती आधार कार्डमध्ये असते. रेकॉर्डेड फ्युचर (Record Future) या सायबर सिक्युरिटी फर्मने सर्व भारतीयांची माहिती असणाऱ्या ‘आधार’च्या डेटाबेसवर चिनी हॅकर्सनी हल्ला केल्याचं म्हटलं आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयच्या (UIDIA database attacked) डेटाबेसमध्ये म्हणजे आधारकार्ड संबंधीच्या संस्थेकडे जवळपास एक अब्जाहून अधिक भारतीयांची माहिती ठेवण्यात आली आहे.

या वर्षी जून आणि जुलैच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला होता. अर्थात, यातून कोणती माहिती चोरण्यात आली की नाही याबाबत कल्पना नसल्याचंही फर्मने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. सरकारने मात्र हा दावा फेटाळला आहे.

अशा प्रकारचा कोणताही सायबर हल्ला झाल्याचं दिसून आलं नाही, असं सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आधारचा डेटाबेस एन्क्रिप्टेड (Adhaar database encrypted) असून, केवळ सरकार आणि त्या-त्या वापरकर्त्यांनाच ही माहिती उपलब्ध असल्याचं यूआयडीएआयकडून स्पष्ट करण्यात आलं. आधारचा डेटाबेस अत्यंत सुरक्षित ठिकाणी आहे. तसंच, याची सिक्युरिटी सिस्टीमही वेळोवेळी अपग्रेड करण्यात येते, असंही सरकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रात सांगण्यात आलं. ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

देशातलं अग्रगण्य मीडिया हाउस असलेल्या टाइम्स ग्रुपलाही (Times group) चिनी हॅकर्सनी लक्ष्य केलं होतं असं रेकॉर्डेड फ्युचरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या वर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टदरम्यान टाइम्सच्या डेटाबेसवर हल्ला करण्यात आला होता; पण यातूनही कोणती माहिती चोरण्यात आली की नाही याबाबत माहिती नसल्याचं रेकॉर्डेड फ्युचरने स्पष्ट केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here