माणुसकी दाखवणारा शाळकरी मुलांचा Video होतोय व्हायरल

0

दि.२३: माणुसकी दाखवणारा शाळकरी मुलांचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ (Video) व्हायरल होतात. अनेक व्हिडिओ मजेशीर (Funny Video) असतात. तर काही व्हिडिओ प्रेरणादायी असतात. लहान मुलं अनेकदा त्यांच्या मोठ्यांकडून खूप काही शिकतात. पण, कधी कधी लहान मुलं असं काही करतात की मोठे मंडळी सुद्धा बघून थक्क होतात.

अनेक उदाहरणे माणुसकी दाखवणारी असतात. काही घटना माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या असतात. माणुसकी माणसाच्या आत असायला हवी, ती खरं तर मोजक्याच माणसांमध्ये आढळते. माणसाने प्रत्येकाशी मग तो गरीब का असेना, सर्वांशी माणुसकीने वागले पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे, हा माणुसकीचा अर्थ आहे. यालाच मानवता म्हणतात. निराधार व्यक्तींना आधार आणि भुकेलेल्यांना अन्न देणे हे मानवाचे कर्तव्य आहे.

अजुनही माणुसकी जिवंत आहे, असं मोठ्या अभिमानाने सांगता येईल असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल, माणुसकी अजून जिवंत आहे. मनही नक्कीच प्रसन्न होईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दोन शाळकरी मुलांचा आहे. हे शाळकरी मुलं म्हणाल फारच लहान पण त्यांनी त्यांच्या कार्यातून लोकांना मोठा संदेश दिला आहे. लहान मुलं अनेकदा त्यांच्या मोठ्यांकडून खूप काही शिकतात. पण, कधी कधी लहान मुलं असं काही करतात की मोठे मंडळी सुद्धा बघून थक्क होतात. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन निरागस मुलं एका असहाय महिलेला कशी मदत करत आहेत हे पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून महिला हातगाडीवर फळे विकत असल्याचे दिसते. एवढंच नाही तर महिलेचे मूलही हातगाडीवर ठेवलेले दिसत आहे. ती महिला गाडी ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

पण जमिनीवर उंच भागामुळे तिची हातगाडी वर चढत नसते. ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहते. पण तिला यश मिळत नाही. त्यानंतर दोन लहान शाळकरी मुलं तिथे पोहोचतात आणि महिलेला मदत करू लागतात. यानंतर तिघे मिळून हातगाडी वर चढवतात. महिलेने दोन्ही मुलांना खाण्यासाठी केळीही दिली. मुलांनी महिलेला ज्या प्रकारे मदत केली, त्यामुळे लाखो लोकांनी या शाळकरी मुलांवर कौतुकाचा वर्षाव सुरू केलाय.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की मुलांनी चमत्कार केला आहे. या व्हिडीओतून लोकांना खूप काही शिकायला मिळालं आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here