कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची आज आरोग्यमंत्री, टास्क फोर्ससोबत बैठक

0

मुंबई,दि.28: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा नवीन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळला आहे. नवीन प्रकार समोर आल्यानंतर, शास्त्रज्ञांनी जागतिक स्तरावर कोविड संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारतात (ओमिक्रॉन) या व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या या नवीन हेरियन त्यामुळे जगभर खळबळ माजलीआहे. जगातले सर्वच देश सतर्क झालेत. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये यासाठी कडक पावलं उचलण्यात येत आहेत. महाराष्ट्रातही सरकारनं (State Government) नवीन नियमावली जारी केली आहे. राज्यातलं सरकारही सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) बैठक घेणार आहेत.

दक्षिण आफ्रिकेतून सुरु असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यामुळे आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर तसंच नव्या व्हेरिएंटमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतील. या बैठकीस राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित असतील.

त्यातच येत्या 3 डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरु होत असलेल्या भारत- न्यूझीलंडमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यावरही कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर 50 टक्केच प्रेक्षक क्षमता ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.राज्यात कोविड-19 या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य सरकारने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत.

राज्य सरकार तसंच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सेवा देणारे, मालक, परवानाधारक तसंच आयोजक यासह सर्व सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी अभ्यागत यांनी करावयाचे आहे. आज जारी केलेल्या या मार्गदर्शक तत्वात संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता, कार्यक्रमावरील निर्बंधाची व्याख्या, कोविड अनुरूप वर्तन, स्थानिक प्रशासनाचे अधिकार, कोविड वर्तणूकविषयक नियम व दंड याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here