मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मोठे वक्तव्य म्हणाल्या, बाहेरून पाठिंबा…

0

कोलकाता,दि.16: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीचा घटक नाही. पश्चिम बंगालच्या लोकसभेच्या सर्व जागा तृणमूल काँग्रेस स्वबळावर लढत आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जागा वाटप न झाल्याने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ममता बॅनर्जी या इंडिया आघाडी विरोधात लढत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. केंद्रामध्ये ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बनल्यास आपण बाहेरून पाठिंबा देऊ, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढत आहे. काँग्रेससोबत जागावाटपामध्ये मतभेद निर्माण झाल्याने ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची इंडिया आघाडीतील कोणत्याही घटकपक्षाशी आघाडी नसल्याचे म्हटले होते. मात्र आता त्यांचा सूर बदलला असून केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास आपण बाहेरून पाठिंबा देऊ असे त्यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here