मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का

0

मुंबई,दि.१६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे ४० शिवसेनेचे आमदार व १२ खासदार गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कडून शिवसेनेला धक्का दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला धक्का देण्यास सुरूवात केली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती झालेली असताना आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. नवी मुंबईतील २ माजी नगरसेवकांसह १० तालुकाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. 

नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे आणि माजी नगरसेविका स्वप्ना गावडेंसह तालुकाध्यक्षांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अलीकडेच अशोक गावडे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यापासून पक्षाची नवी मुंबईतील ताकद अगदीच तोळामासा झाली आहे. एकेकाळी पक्षाचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, त्यात गणेश नाईक यांच्या ताकदीचा प्रभाव होता. दरम्यान, अशातच अशोक गावडेंनी पक्ष सोडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला आता आणखी एक फटका बसला आहे. 

नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही पक्ष सोडणार अशा बातम्या समोर येत आहेत. तुमची भूमिका काय ती स्पष्ट करा. यावर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी बोलून सांगतो असं म्हटलं. पक्ष कार्यकर्त्यांशी बोलणार म्हणजे तुमच्या मनात काहीतरी ठरलं आहे. त्यांनी मला यानंतर होय मी पक्ष सोडणार आहे असं म्हटल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. “ते जर पक्ष सोडणार असतील तर त्या ठिकाणी दुसरा अध्यक्ष असल्याशिवाय पर्याय नाही. मी अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आता ते पक्ष सोडणार, अध्यक्ष हा द्यावाच लागतो त्यामुळे नामदेव भगत यांची नियुक्ती केल्याची घोषणा करतो असं आव्हाडांनी म्हटलं होतं. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here