Chhattisgarh News: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद

0

मुंबई,दि.26: Chhattisgarh News: छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. छत्तीसगडमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. आयईडी ब्लास्टमध्ये (IED Blast) तब्बल 11 जवान शहीद झाले आहेत.

नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद | Chhattisgarh News

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरनपूर पोलीस ठाण्यांतर्गत माओवादी कॅडरची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. आज दंतेवाडा येथून नक्षलविरोधी अभियानासाठी डीआरजी दल पाठवण्यात आलं होतं. डीआरजी पथक परतत असताना अरनपूर रस्त्यावर आयईडी स्फोट घडवून आणला. या स्फोटात 10 डीआरजी जवान आणि ऑपरेशनमध्ये सहभागी एक ड्रायव्हर शहीद झाला.

फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यामध्ये शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता चकमक उडाली होती. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी आपले साहित्य तिथेच टाकून जंगलात पळ काढला. ते साहित्य पोलीस पथकाने जप्त केले होते.

तेव्हा बोधीनटाेला जंगल परिसरात 20 ते 25 नक्षलवादी जमले असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष अभियान पथकाचे जवान या भागात नक्षल विराेधी माेहीम राबवत हाेते. दरम्यान नक्षलवाद्यांनी पाेलिसांच्या दिशेने गाेळीबार केला. पाेलिसांनीही प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here