अहिंसा गो शाळा |अहिंसा गो शाळेत छत्रपती शिवाजी प्राथामिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल

अहिंसा गो शाळा | गो शाळेतील गायींच्या पवित्र सान्निध्यात रमले चिमुकले !

0

सोलापूर,दि.१९: अहिंसा गो शाळा | पक्ष्यांचा किलबिलाट, गायींचा हंबरडा आणि सोबत सूर्याची कोवळी किरणे झेलत छत्रपती शिवाजी प्राथामिक शाळेचे विद्यार्थी बार्शी रोड येथील अहिंसा गो-शाळेत रमले. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने या अनोख्या सहलीचे आयोजन केले होते.

विद्यार्थ्यांना गो शाळा, गो धन याची माहिती व्हावी या उद्देशाने ही सहल काढण्यात आली होती. या गो शाळेत दिड हजार २०० गायीचे संगोपन, झाडे, वेली, पशू-पक्षी, जैविक शेतीसह दूध, तूपनिर्मिती, शेणापासून सेंद्रिय खत, दंतमंजन, शाकाहार प्रसार व येथील जैवविविधता पाहून सर्व लहानग्यांची मने प्रफुल्लित झाली.

प्रारंभी छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयातील पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील विविध संत, महापुरुषांच्या प्रतिमा पाहत येथील स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना विश्रमा माजी यानी गीर, कांकरेज, खिल्लर आणि गावठी गायीचे संवर्धन कसे केले जाते हे दाखविण्यात आले. या शैक्षणिक सहलीमध्ये ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर इलेक्ट्रीकल असोसिएशनचे अशिष कोठारी, रमन भुतडा, संस्थेचे अध्यक्ष महेश कासट, आदी उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी प्रशालेचे मुख्याध्यापक परमेश्वर काळे , प्रतिपदा जाधव व शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे, महेश ढेंगले, शंकर बंडगर, रविशंकर जवळे, केशव भैय्या, अभिजीत होनकळस, श्लोक सक्करगी, सुरेश लकडे, सुजाता सक्करगी, भारती जवळे, माधुरी चव्हाण, शुभांगी लचके आदींनी परिश्रम घेतले.

गो पालनाचे महत्त्व सांगण्यासाठी सहल : कासट

ऐतिहासिक वास्तू, पर्यटन स्थळांना सहली काढण्यात येतात. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीत गाय आणि गो पालन याला महत्त्व आहे. गो शाळेत नेमके कशा पद्धतीने संवर्धन केले जाते. याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने ही विद्यार्थ्यांची सहल श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आली, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here