छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं साताऱ्यात दाखल

0

मुंबई,दि.१७: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत. या ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले. 19 जुलै रोजी याचं दिमाखात मोठं स्वागत केलं जाणार आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनख्यांसाठी विशेष अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे.

साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहे.  वाघनखांचे जंगी स्वागत जिल्हा प्रशासनासह साताऱ्यातील शिवभक्त करणार आहेत. या स्वागतासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

साताऱ्यात या वाघनखांच्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहतील. १९ जुलैला ढोल-ताशांच्या गजरात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर सर्व सातारकरांना ही वाघनखं पाहाता येणार आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here