Chhagan Bhujbal On Brahmin: ब्राम्हण समाजासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य

0

मुंबई,दि.१९: Chhagan Bhujbal On Brahmin: ब्राम्हण समाजासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केले आहे. ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. काहींना सरस्वती तर काहींना शारदा आवडते. पण, महात्मा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली, असे भुजबळ यांनी म्हटलं.

एका कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “काही लोक म्हणतात, तुम्ही इकडे-तिकडे गेलात. पण, कुठेही गेलो तरी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नाही.”

लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला | Chhagan Bhujbal On Brahmin

“संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दाम संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं,” अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

“इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल. कारण, जोपर्यंत आपला इतिहास माहिती होणार नाही, तोपर्यंत आपण भविष्याकडे बघू शकत नाही. राज्यक्रांतीकारकापासून समाजक्रांतीकारपर्यंत हा आपला वारसा आहे. महात्मा फुलेंनी सांगितलंय, ‘सत्तेविना सर्व कळा झाल्या अवकळा.’ सत्ता असेल, तर तुम्ही समाजासाठी पाहिजे ते करू शकता,” असेही छगन भुजबळ यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here