बाऊंड्री लाईनवर चेन्नईचा आक्रमक फलंदाज फॅफ डु प्लेसिसने घेतला अफलातून रिले कॅच

0

दि.26 : सध्या IPL चे सामने सुरू आहेत. आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021 Match 38th) 38 वा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात येत आहे. कोलकाताने टॉस जिंकत पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईचा आक्रमक फलंदाज फॅफ डु प्लेसिसने (Faf du Plessis) बाऊंड्री लाईनवर अफलातून रिले कॅच (Relay Catch) घेतला. फॅफने कोलकाताचा कर्णधार इयोन मॉर्गनचा (Eoin Morgan) हा भन्नाट कॅच घेतला. हा कॅच घेतल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय.

सामन्यातील 10 वी ओव्हर जोश हेझलवूड टाकत होता. या ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर इयोनने लॉन्ग ऑनच्या दिशेने फटका मारला. तिथे फॅफ उभा होता. इयोनने आपल्या दिशेने येत असलेला चेंडू पाहिला. तो सावध झाला. फॅफने कोणतीही चूक न करता कॅच घेतला. मात्र यानंतर फॅफ 2 पावलं मागे गेला.

मागे बाऊंड्री असल्याचं फॅफच्या लक्षात आलं. तेवढ्यात फॅफने बॉल हवेत उडवला. सीमारेषेच्या बाहेर गेला. पुन्हा आत येत बॅल्नस राहत सुपर कॅच पूर्ण केला. दरम्यान फॅफने असा कॅच घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही फॅफने असा कारनामा केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here