चंद्रशेखर बावनकुळे यांचे अजित पवार यांच्याबाबत मोठं विधान

0

ठाणे,दि.5: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित राहिले होते. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) मात्र गैरहजर राहिले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी चिमटा घेत प्रतिक्रिया दिली आहे. संघटनामक दोऱ्याच्या निमित्ताने बावनकुळे हे शनिवारी ठाण्यात आले होते. तेव्हा त्यांनी संयोग मंदिर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले – –

हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण अजित पवार कधीही कुठे जातात आणि परत येतात. अजित पवार कधी नाराज होतील, याचा नेम नाही. यावरुन असं दिसतय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस आहे. सत्ता गेल्यापासून सर्वच अस्वस्थ आहेत. गेल्या अडीच वर्षात जो भ्रष्टाचार झाला त्याची भिती आता वाटत आहे. शरद पवार साहेबांमुळे ही बंडाळी रस्त्यावर येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व पवार साहेबांमुळे आहे, ते असेपर्यंत हे कुठे जातील एवढी त्यांच्यात हिम्मत नाही, असा टोला बावनकुळे यांनी अजित पवार यांना लगावला.

सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस राहू शकत नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपा 40 वर्षे विरोधात होती. पक्ष वाचवण्यासाठी आघाडी करतील. मागच्या वेळेस कपट कारस्थान करुन सत्तेत आले अशी टीका बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

भारतीय जनता पार्टी हा राज्यातला पहिला क्रमांकाचा पक्ष आहे .पण आम्हांला पक्षाची ताकद राज्यात 51टक्के इतकी वाढवायची. परिणामी कितीही पक्ष एकत्र आले तरीही आमचाच विजय होईल यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे ध्येय आहे. असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here