बारामती,दि.6: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाने मिशन 2024 हाती घेतले आहे. निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांच्यावर बारामतीची जबाबदारी दिलीय. निर्मला सीतारामन या बिन टाक्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणारही नाही. ऑपरेशन कसं झाले आणि भाजपाचा खासदार दिल्लीला कसा गेला अशा शब्दात गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली आहे.
गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar) म्हणाले की, 22, 23 आणि 24 सप्टेंबरला निर्मला सीतारामन महाराष्ट्रात येणार म्हटल्यावर सुप्रिया सुळे सातत्याने सरकारवर टीका करायला लागल्यात. तुम्ही चिंता करू नका. 50 वर्ष खूप सेवा केली आता तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे. जनता 2024 ला सुप्रिया सुळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे. पुणे जिल्ह्यात भाजपाचं संघटन कार्यकर्त्यांनी टिकवून ठेवलं. 2019 ला विश्वासघातानं सरकार बनवलं. जेव्हा एखाद्याचं लुबाडून घ्यायचं. हिसकावून घ्यायचं तेव्हा बारामतीकरांना आनंद असतो. जनतेने निवडून दिलेल्या सरकारप्रमाणे शपथविधीनंतर पहिल्या अधिवेशनात त्यावेळी सुप्रिया सुळे वरमाई असल्यासारख्या फिरत होत्या. राज्यात गणपती बसले आहेत. आता अनेकठिकाणी विसर्जन सुरू आहे. गणपती दरवर्षी येत असतात. परंतु 2024 ला पवारांचं विसर्जन करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आवर्जुन संघटनेच्या कामाची सुरुवात करायला बारामतीत आलेत असं पडळकरांनी म्हटलं.
बारामती लोकसभेत परिवर्तन करण्याची वेळ आली आहे आणि हे परिवर्तन निश्चित होणार आहे. हे फार अवघड काम नाही. हा किल्ला, बालेकिल्ला म्हटलं जातं पण ही पवारांची टेकडी आहे. केवळ वातावरण निर्मिती केली जात आहे. राष्ट्रवादीचं राजकारण पोलिसांवर चालतं. तहसिलदार, प्रांत, तलाठी यांच्यावर राजकारण चालतं. त्यापलीकडे राजकारण जात नाही असा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला.
हा पवारांचा बालेकिल्ला नाही तर टेकडी