भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

0

मुंबई,दि.17: भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर पाटील यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत होती. अखेर पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. चिंचवडमध्ये पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. शाईफेक करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली होती.

ॲट्रॉसिटी दाखल होणार?

चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेलं वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे. पाटील, भाजपचे नेते आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासह इतर लोकांवर ॲट्रॉसिटी दाखल होण्याची शक्यता आहे. या सर्वांवर आरोपी गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करणारी याचिका सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पाटील यांनी काही दिवसापूर्वी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. तर चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

याचिका दाखल

याच संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राम कदम, मुंबई पोलीस आयुक्त यांच्यासह इतर आरोपी म्हणून यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करता सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सदर याचिकेवर मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश ए. पी. कनाडे यांच्या कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here