सोलापूर,दि.३१: Chandrakant Patil On Maratha Reservation: भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला कधी अस्पृश्येतेची वागणूक मिळाली नाही असे वक्तव्य केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज (दि.३१) तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी करत उपोषण सुरू केले आहे.
काय म्हणाले मंत्री चंद्रकांत पाटील? | Chandrakant Patil On Maratha Reservation
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा समाजाला कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. मराठा समाजाला कधी गावाच्या बाहेर राहावे लागले नाही. मराठा समाज जातीने मागास नाही. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. मराठा समाजाला EWS मध्येच आरक्षण मिळत आहे आणि मिळू शकेल. घराघरात वाटणी झाली यामुळे कमी जागा, शेती मिळाली परिणामी मराठा समाज आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाला असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणे अशक्य आहे असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे तसेच सगेसोयरेची अंमलबजावणी करावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.