सांगली,दि.२८: Chandrakant Patil On Jayant Patil मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगलीमधील मिरज येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भाजपा प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहे.

जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. जयंत पाटलांना भाजपामध्ये घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील असं म्हटलं आहे. तसेच असा निर्णय झाला तर ते काय करणार हे सुद्धा चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं. “जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसच घेतील. तसा निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणचं जाऊ आणि त्यांना भाजपात या म्हणू! मात्र देवेंद्र फडणवीस असा निर्णय करतील अशी कोणतीही शक्यता आज दिसत नाही,” अशा शब्दात भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलं आहे.