Chandrakant Khaire On Lok Sabha: लोकसभा निवडणूक निकालाबाबत चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा

0

छत्रपती संभाजीनगर,दि.31: Chandrakant Khaire On Lok Sabha: शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. निकालापूर्वी अनेकजण विजयी होणार असल्याचा दावा करत आहेत. महाराष्ट्रात उध्दव ठाकरेंबाबत सहानुभूती होती असे अनेकांचे म्हणणे आहे. याचा महाविकास आघाडीला फायदा होईल अशी शक्यता आहे. अशातच चंद्रकांत खैरेंनी मराठवाड्यातील जागांबाबत मोठा दावा केला आहे.

चंद्रकांत खैरे यांचा मोठा दावा | Chandrakant Khaire On Lok Sabha

मराठवाड्यात आठच्या आठ जागा महाविकास आघाडीच्या येणार आहेत असा आमचा रिपोर्ट आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे, जालनात रावसाहेब दानवे हेदेखील पडणार असे संकेत आहेत. त्यांचीच माणसं बोलतायेत. हे दोन्ही नेते पडतील असं भाजपा नेतेच म्हणतायेत असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. 

मागील निवडणुकीत रावसाहेब दानवेंनीच मला पाडलं. त्यामुळे परमेश्वर बदला घेतो, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत. मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. असेही ते म्हणाले.

महायुतीला 8 ते 10 जागा मिळतील. अपक्ष वैगेरे कोण येणार नाही. महायुती, मविआत थेट लढत आहे. एकनाथ शिंदे संपले. सगळे खोके घेऊन गेलेत. लोकांना त्यांच्याबद्दल राग आहे. उद्धव ठाकरेंना सोडून दिले. ज्याने मोठे केले त्यांच्या विरोधात जातात त्यामुळे लोक विरोधात आहेत असं त्यांनी म्हटलं. 

मुस्लिम मतेही मला मिळणार | Chandrakant Khaire

मी एक ते दीड लाखांचं मताधिक्य घेऊन विजयी होणार आहे, असा दावा संदीपान भुमरे यांनी केला आहे. भुमरे यांच्या या दाव्यावरही त्यांनी टीका केली. भुमरेंनी ईव्हीएम मशीन बदलल्या आहेत काय? एक लाखाचं मताधिक्य घेऊन निवडून येणं कसं शक्य आहे? असा सवाल त्यांनी केला. यावेळी हिंदू मते तर मिळणारच आहे. पण 22 टक्के मुस्लिम मतेही मला मिळणार आहे, असा दावा त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here