Chandrababu Naidu: भाजपा वर चंद्राबाबू नायडू यांचे दबाव तंत्र सुरू

0

सोलापूर,दि.5: चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी भाजपा वर दबावतंत्र सुरू केले वृत्त वृत्तवाहिनीने दिले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीने 292 जागा जिंकल्या आहेत. मात्र, भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. अशा परिस्थितीत केंद्रात सत्ता काबीज करण्यासाठी भाजपला मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. या आघाडी सरकारमध्ये आंध्रप्रदेशच्या राजकारणातील मोठा चेहरा असलेल्या आणि यावेळी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या चंद्राबाबू नायडूंचा मोठा वाटा असणार आहे.

नायडू यांच्या टीडीपीने 16 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता एनडीए सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात चंद्राबाबू नायडू सरकारमध्ये मोठ्या भागभांडवलांची मागणी करू शकतात, असे मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायडू यांची सर्वात मोठी मागणी लोकसभा अध्यक्षपदासाठी असणार आहे. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू कोणत्या मंत्रिपदाची मागणी करू शकतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

टीडीपी ही मागणी करू शकते | Chandrababu Naidu

  1. लोकसभा अध्यक्ष पद
  2. रस्ते वाहतूक
  3. ग्रामीण विकास
  4. आरोग्य
  5. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार
  6. कृषी
  7. जलशक्ती
  8. माहिती आणि प्रसारण
  9. शिक्षण
  10. वित्त (MoS)

एनडीएचे 5 मोठे मित्रपक्ष

TDP 16
जेडीयू 12
शिवसेना (शिंदे गट) 7
लोजपा (रामविलास) 5
जेडीएस 2


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here