CBI: केंद्रीय अन्वेषण विभागाच्या बीकेसी कार्यालयातील ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

0

मुंबई,दि.९: CBI: केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) बीकेसी कार्यालयातील ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच मुंबईत (Mumbai) मोठया संख्येने रुग्ण आढळत आहेत. सीबीआयकडून मुंबई महानगरपालिकेला बीकेसी कार्यालयातील २३५ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास सांगण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल शनिवारी समोर आला. यामध्ये ६८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

सध्या मुंबईत डॉक्टर्स, बेस्ट कर्मचारी आणि पोलिसांना मोठ्याप्रमाणावर कोरोनाची लागण होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबई पोलीस दलांतील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्याच्या घडीला पोलीस दलातील तब्बल ४०० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहखात्याने ५५ वर्षांवरील पोलिसांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले होते. तसेच गेल्या ४८ तासांत कोरोनाग्रस्त दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तसेच मोटर परिवहन विभागात कार्यरत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र भाटी यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२५ वर पोहोचली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here