Vinod Tawde: भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल 

0

मुंबई,दि.19: महाराष्ट्रात उद्या (20) मतदान होणार आहे. तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदानाला अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर नालासोपारा येथे पैसे वाटल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. पैशांच्या बंडलाचे फोटो आता समोर आले आहेत.यावरून तब्बल साडेतीन तास बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं होतं.आता यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले विनोद तावडे?

पैसे वाटल्याच्या आरोपांवर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा आपल्याविरुद्धचा कट असून निवडणूक आयोगाने याची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, असं तावडे यांनी सांगितले आहे. विनोद तावडे म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा डाव आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, असंही तावडे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here