औरंगाबाद,दि.3: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झाला आहे. 1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा झाली होती. राज ठाकरे यांनी दिलेल्या भोंग्याप्रकरणी दिलेल्या अल्टीमेटमला अवघे काही तास शिल्लक असताना आता महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवण्याबाबत सरकारला इशारा दिला होता.
राज ठाकरे यांच्या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. आता याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन आल्याचं समोर आलं होतं. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.