असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल

0

नवी दिल्ली,दि.9: वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि स्वामी नरसिंहानंद (Swami Narsinghanand) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भडकाऊ वक्तव्ये आणि सोशल मीडियावर द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्लीपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी यती नरसिंहानंद यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषणे दिल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह 9 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, द्वेषपूर्ण वक्तव्ये करुन वातावरण बिघडवणाऱ्यांवर दिल्ली पोलिसांची कडक कारवाई सुरूच राहणार आहे. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर कठोर कारवाई केल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषयुक्त संदेश पसरवणे, खोट्या आणि पुष्टी नसलेल्या बातम्या पसरवणे, धार्मिक सलोखा बिघडवणे आणि इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुधवारीदेखील दिल्ली पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. त्यांच्यावरही द्वेषयुक्त संदेश पसरवणे, वेगवेगळ्या गटांना भडकवने, शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते अशी परिस्थिती निर्माण करणे, असे आरोप आहेत. विशेष सेलच्या ‘इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन’ (IFSO) युनिटने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here