Car Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात 2 ठार

Accident News: अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

0

मुंबई,दि.11: Car Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) भीषण अपघात झाला आहे. अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. हा भीषण अपघात सकवार गावाच्या हद्दीत झाला आहे. (Accident News)

अपघातात दोंघाचा मृत्यू | Car Accident

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मिरा रोडच्या वॉकर्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.

अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात | Accident News

मुंबईच्या प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (71), रमेश मुसळे (51), माधुरी मुसळे (50) आणि रुचिक देसाई (30) हे चौघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पालघरला ह्युंदाई क्रेटा या कारने गुरुवारी सकाळी जात होते.

सकाळी साडे दहाच्या सुमारास सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून 400 मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील डिव्हायडरला ठोकर दिल्याने अपघात झाला.

जखमींची प्रकृती चिंताजनक

या भीषण अपघातात जखमी झालेल्या 2 जणांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रमेश मुसळे (51) आणि रुचिक देसाई (30) या दोघांचा मृत्यू झाला. तर अशोक मुसळे (71) आणि माधुरी मुसळे (50) या दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मीरा रोड च्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here