सोलापूर,दि.26: सोशल मिडीयावर एक व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. तमिळनाडूच्या तंजावरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे दोन वेगवान बसमध्ये अडकून एक तरुण चमत्कारिकरित्या बचावला. ज्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, तो तरुण कसा वाचला?
वास्तविक 3 जानेवारीला एक खाजगी बस थामरनकोट्टईहून पट्टुकोट्टईला जात होती. यावेळी बसचा वेग थोडा कमी झाला आणि भरत नावाचा तरुण बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना खासगी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एक सरकारी बस डावीकडून गेली.
त्यामुळे भरत दोन बसमध्ये अडकला आणि तोल गेला. अशा स्थितीत तो जमिनीवर पडला, मात्र किरकोळ ओरखडे पडून तो चमत्कारिकरित्या बचावला. हा अपघात खासगी बसमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो आता व्हायरल झाला आहे. बस थोडीशीही वळली असती तर त्याला जीव गमवावा लागला असता.
भरतने पांढरा शर्ट घातला असून तो रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, एका खासगी बसचा वेग कमी झाल्याने भरत त्यामध्ये चढण्यासाठी पुढे सरसावला, मात्र इतक्यात मागून एक सरकारी बस आली. त्यामुळे भरत सरकारी बसला धडकला. खासगी बस आणि सरकारी बसमध्ये फारच कमी जागा होती. त्यामुळे भरत जमिनीवर पडला. मात्र, तो चमत्कारिकरित्या बचावला. पण त्याला थोडी दुखापत नक्कीच झाली आहे.