Buldhana ST Bus Accident: एसटीचा भीषण अपघात, 55 प्रवाशांची बस घाटात पलटी

0

बुलढाणा,दि.25: Buldhana ST Bus Accident: बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानं ही बस राजूर घाटात पलटी झाली आहे. या बसमधून एकूण 55 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने राजूर घाटाकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदकार्य सुरू केलं असून अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिकांकडून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

Buldhana ST Bus Accident | ब्रेक फेल झाल्यानं अपघात

मलकापूर -बुलढाणा या बसमधून 55 प्रवासी प्रवास करत होते, बस राजूर घाटात आल्यानंतर बसचं ब्रेक फेल झालं. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. बस घाटात पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here