Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील 4 गावांचा मध्य प्रदेशात जाण्याचा निर्णय

Buldhana News | नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे.

0

बुलढाणा,दि.7: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील 4 गावांनी मध्य प्रदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. Buldhana News सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जत तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. अशात आता बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांचा मुद्दा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र कर्नाटक वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे.

बुलढाण्यातील 4 गावांचा मध्य प्रदेश जाण्याचा निर्णय | Buldhana News

मध्यप्रदेशच्या सीमेवरील बुलढाण्यातील 4 गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मध्यप्रदेश जाण्याचा निर्णय घेतला आहे. गावात मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होऊन निर्णय घेतला असून यासंदर्भातील निवेदनही उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. दरम्यान यापूर्वी तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील गावकऱ्यांनी अशीच मागणी केली होती. यावरून राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला होता.

Buldhana News,

मुलभूत सुविधा मिळत नसल्याने मध्य प्रदेशात जाण्याचा निर्णय

सांगली जिल्हाच्या जत तालुक्यातील 40 गावांना पाणी आणि मुलभूत सुविधा मिळत नसल्याने कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. तसाच निर्णय आता बुलढाणा जिल्ह्यातील जामोदमधील गावकऱ्यांनी केला आहे. जिल्हा प्रशासन मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यास असमर्थ असल्यानं जिल्हा प्रशासनाचा निषेध करत बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवरील चार गावांनी मध्य प्रदेशात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक निवेदन त्यांनी काल (दि. 06) उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले, त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील 4 गावांची मध्य प्रदेशात सामील करून घेण्याची मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवरील भिंगारा 40 टपरी गोमाल एक आणि गोमाल दोन अशा चार गावातील नागरिकांनी मूलभूत सुविधा बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि जळगाव जामोद तालुका प्रशासन पुरवण्यास असमर्थ असल्याने आम्हाला मध्य प्रदेशात सामील करून देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here