Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले बजेट

0

नवी दिल्ली,दि.1: Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा दुसरा अंतरिम अर्थसंकल्प असेल. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अंतरिम अर्थसंकल्प नवीन सरकारचा कार्यभार हाती घेईपर्यंत अत्यावश्यक सेवा राखण्यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतो, परंतु त्यात अनेक महत्त्वाच्या अपेक्षा आहेत. अंतरिम अर्थसंकल्प, ज्याला बहुधा मतानुसार खाते म्हणून ओळखले जाते, ही सरकार काही महिन्यांसाठी सादर केलेली आर्थिक योजना आहे. सरकारचा कार्यकाळ संपायला कमी वेळ शिल्लक असताना हे अनेकदा मांडले जाते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या सबका साथ सबका विकासवर सरकारचं काम सुरु आहे. ‘गेल्या १० वर्षात अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम.  देशाला नवी दिशा, नवी आशा मिळाली. सबका साथ सबका विकासच्या दृष्टीनं काम सुरू.’

सर्वांसाठी  घर, सर्वांसाठी जल, सर्वांसाठी वीज यावर जोर. ८० कोटी लोकांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी एमएसपी वाढवण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेकडेही लक्ष.

शेतकऱ्यांना विम्याचा लाभ

४ कोटी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला. गरीब, महिला, तरुण, अन्नदात्यांवर फोकस. स्वनिधी योजनेद्वारे २.३ लाख स्ट्रीट वेंडर्सना कर्ज देण्यात आलं. ३० कोटींचं मुद्रा लोन महिला उद्योजकांना देण्यात आलं.

गरीबांसाठी २ कोटी घरं उभारणार

रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म मिशनवर काम सुरू. एमएसएमईसाठी व्यवहार सोपं करण्यावर काम सुरु आहे. पुढील ५ वर्षात गरीबांसाठी ५ कोटी घरं उभारली जातील.  

३०० युनिट वीज मोफत देणार

सर्वसमावेशी विकासाला चालणारं आमचं सरकार आहे. प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. अनेक आव्हानांनंतरही ग्रामीण क्षेत्रात ३ कोटी घरं उभारण्याचं लक्ष्य पूर्ण केलं. पुढील ५ वर्षांत २ कोटी घरं उभारली जाणार. देशातील १ कोटी घरांना सौर ऊर्जेद्वारे ३०० युनिट वीज मोफत देणार.

सर्वायकल कॅन्सरचा सामना करण्यासाठी आमच्या सरकारनं लसीकरण आणलं आहे. मुलींचा यापासून बचाव करण्यासाठी मोफत लसीकरण केलं जाईल. देशातील मेडिकल कॉलेजमधील सुविधा वाढतील. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत सर्व आशा कर्मचारी आणि आंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यात येणार आहेत.

देशातील एक कोटींपेक्षा अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत. याचं ध्येय आता २ कोटींवरून वाढवून ३ कोटी करण्यात आलंय. ९ कोटी महिलांच्या जीवनात बदल झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here