BSNL 5G: BSNL या तारखेला सुरू करणार 5G सेवा, मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

0

नवी दिल्ली,दि.2: BSNL 5G सेवा सुरू करणार असल्याची घोषणा टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. देशात बहुप्रतिक्षित अशा 5G नेटवर्कला (5G Internet Service) सुरुवात झाली आहे. देशात कालपासून 5जी नेटवर्कची घोषणा झाली आहे. एअरटेलने सुरुवातीला आठ शहरांत 5जी सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. तर रिलायन्सने दिवाळीपर्यंत देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सेवा सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. व्होडाफोनचा तर पत्ताच नाहीय.

एअरटेल, रिलायन्स जिओच्या गोटात खळबळ उडविणारी बातमी येत आहे.  सरकारी कंपनी जी आजवर 4जी लाँच करू शकली नाही, ती आता 5G मध्ये उतरणार आहे. गावागावात नेटवर्क असलेली बीएसएनएल 5G सेवा देणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या ग्राहकांना आता फार वेळ वाट पहावी लागणार नाही. BSNL ची 5G सर्व्हिस 15 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. यावरून टेलिकॉम मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. याची घोषणा इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये करण्यात आली आहे. 

बीएसएनएल पुढील वर्षी ऑगस्टमध्ये 5जी सेवा लाँच करेल. यामुळे तीन खासगी कंपन्या आणि एक सरकारी कंपनी असे चार कंपन्यांमधील चांगल्या स्पर्धेचे एक स्वस्त नेटवर्क तयार होईल, असे वैष्णव यांनी म्हटले आहे. बीएसएनएल आताकुठे नेटवर्कवर 4G लाँच करत असताना पुढील वर्षी 5जीचे लक्ष्य कसे साध्य करू शकेल, असे विचारले असता, वैष्णव म्हणाले की 4G वरून 5G ला जाणे खूप कठीण नाही. या कालावधीत ते साध्य केले जाऊ शकते. BSNL चे 5G नेटवर्क नॉन-स्टँडअलोन आर्किटेक्चरवर आधारित असेल. यामध्ये ऑपरेटर तुलनेने कमी गुंतवणुकीसह त्यांच्या विद्यमान नेटवर्क पायाभूत सुविधांचा जास्तीत जास्त वापर करू शकतात, असे ते म्हणाले.

5जी बाबत बोलताना वैष्णव यांनी पुढील सहा महिन्यांत 200 शहरांत 5जी सेवा पोहोचणार असल्याचे आश्वासन दिले. पुढील दोन वर्षांत देशातील 80 ते 90 टक्के भागात ५जी सेवा मिळेल. 5जी सेवा ही परवडणारी देखील असेल, असे ते म्हणाले. 

IMC 2022 मध्ये Airtel चा 5G स्पीड 300Mbps वर जात होता. एअरटेलची 5G सेवा 8 शहरांमध्ये प्रथम दिली जात आहे. सध्या Vi 5G च्या रोलआउटबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.  एअरटेलने दिल्ली, वाराणसी, मुंबई, बंगळूरू, सिलिगुडी, हैदराबाद, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आजपासून 5जी सेवा सुरु केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here