BS Yediyurappa granddaughter suicide: माजी मुख्यमंत्री BS Yediyurappa यांच्या नातीची आत्महत्या

0

दि.28: BS Yediyurappa granddaughter suicide: भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नातीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. यामध्ये आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या स्वतः डॉक्टर होती आणि ती फक्त 30 वर्षांची होती. शुक्रवार, 28 जानेवारी रोजी तिचा मृतदेह बेंगळुरू येथील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

सध्या येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेंगळुरू येथील बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयात नेण्यात आला आहे. सौंदर्या विवाहित आहे, ती चार महिन्यांच्या मुलाची आई देखील होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्यामध्ये गर्भधारणेनंतरच्या नैराश्याची लक्षणे आढळून आली. सकाळी तिने दरवाजा उघडला नाही तेव्हा मोलकरणीने जाऊन दरवाजा उघडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. येडियुरप्पा यांची थोरली मुलगी पद्मा यांची ती मुलगी होती.

या प्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांनी सांगितले की, सौंदर्या ही गरोदरपणानंतरच्या नैराश्याची शिकार होती. ज्ञानेंद्र म्हणाले की, येडियुरप्पा स्वत: सौंदर्याला अनेकदा सोबत घेऊन जात असत, जेणेकरून ती आनंदी राहावी. यात काही संशयास्पद नाही, तिची उदासीनता सर्वांना माहीत आहे, असे मंत्री म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here