दि.5: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. बरेचसे व्हिडिओ हे मजेशीर असतात. अलीकडे नवरा नवरीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. आपल्याच लग्नात डान्स करण्याचा ट्रेंड वाढला आहे. असे व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडिओ असेही असतात जे अपलोड होताच व्हायरल होतात. सध्या अशाच एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. यात नवरी आपल्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसते.
नवरी आपल्याच लग्नात जबरदस्त डान्स (Dance Video of Bride) करताना दिसते. नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणींनी कुली नंबर 1 चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओमधील ही तरुणी सोविना चावला आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.
हेही वाचा लग्न दीराच चर्चा मात्र वहिनीची, वहिनीनी केला जबरदस्त डान्स
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरी आणि तिची गर्ल गँग गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसते. ग्रुपचा हा खास डान्स तिथे उपस्थित इतर लोकही एन्जॉय करत आहेत. व्हिडिओमध्ये लोक टाळ्या वाजवताना आणि हूटिंग करताना दिसतात. हा डान्स सोशल मीडिया यूजर्सला इतका आवडला आहे की लोकांनी तो इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे.