ब्राह्मण समाज सेवा संघातर्फे दोन लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप 

0

सोलापूर,दि.१: Brahmin Samajseva Sangh Solapur: ब्राह्मण सेवा संघातर्फे समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजू अशा ३९ विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयाच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. तसेच उत्तुंग यश मिळविलेल्या सात विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.  

हा कार्यक्रम डॉ. प्रा.श्रृती वडगबाळकर यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर होत्या. यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण समाज सेवा संघाच्या अध्यक्षा मीनाताई चाटी आणि सचिव वामन कुलकर्णी उपस्थित होते.

उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना डॅा. वडगबाळकर यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ज्या विद्यार्थ्यांना आता शिष्यवृत्ती मिळाली आहे, त्यांनी भविष्यकाळात या संस्थेला मदत देऊन इतर गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत होण्यासाठी अर्थसाह्य करावे. रोहिणी तडवळकर यांचेही भाषण झाले. 

यावेळी प्रा. मोहिनी पतकी, सुहास देशपांडे, दत्ता आराध्ये, अमित कामतकर, रमण कुलकर्णी यांच्याही हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. पालकांतर्फे प्रमोद केसकर यांनी तर विद्यार्थ्यांतर्फे वैद्य गजानन कुलकर्णी आणि साक्षी वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. 

सेवा संघाच्या अध्यक्षा मीनाताई चाटी यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार केला. राम तडवळकर यांनी प्रास्ताविक केले. जितेश कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर सेवा संघाचे सचिव वामन कुलकर्णी यांनी आभार मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here