Booster Dose: कोरोना लसीचा दुसरा आणि बूस्टर डोसमध्ये किती असेल अंतर? ही आहे सरकारची योजना

0

Corona Vaccine Booster Dose: भारतात, कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमध्ये (Booster Dose) 9 ते 12 महिन्यांचे अंतर असू शकते. सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Covishield आणि कोव्हॅक्सिन लसीचा तिसरा डोस आणि बूस्टर डोस (Booster Dose) यांच्यातील वेळेचे अंतर निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. (Corona Vaccine Booster Dose)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उशिरा घोषणा केली होती की, देशातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाईल. त्याच वेळी, 10 जानेवारीपासून आरोग्य सेवा आणि फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाईल. देशात ओमिक्रॉन (Omicron) प्रकारांची प्रकरणे वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ही घोषणा केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) सध्या लसीचा दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील कालावधी 9 ते 12 महिन्यांच्या दरम्यान असावा की नाही यावर चर्चा करत आहे. भारतातील 61 टक्के प्रौढ लोकसंख्येचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याच वेळी, प्रौढ लोकसंख्येपैकी 90 टक्के लोकांनी लसीचा किमान एक डोस घेतला आहे.

रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, शनिवारी देशात लसीचे एकूण 32 लाख 90 हजार 766 डोस देण्यात आले. त्यानंतर देशातील एकूण लसीकरणाचा आकडा 141.37 कोटींवर गेला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here