bogus voting: 8 वेळा मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक, पुन्हा मतदान घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

0

सोलापूर,दि.20: bogus voting: काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव (akhilesh yadav) यांनी X वर शेअर केलेला व्हिडीओ रिट्विट केला होता. या एका मतदाराने 8 वेळा मतदान केल्याचा दावा करत व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेश येथील मतदार केंद्रातील हा व्हिडीओ आहे. निवडणूक आयोगाचे कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका व्यक्तीने 8 वेळा मतदान केल्याचा दावा केल्यानंतर आता संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे. दरम्यान, मतदान करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे. यासोबतच मतदान पक्षाच्या सर्व सदस्यांना (पोलिंग एजंट) निलंबित करण्यात आले आहे.

वास्तविक, एटा येथील या मतदान केंद्रावर एका व्यक्तीने दावा केला होता की, त्याने 8 वेळा मतदान केले आहे. त्याने याचा एक व्हिडिओही बनवला होता, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनीही शेअर केले आहे.

मतदाराला अटक | bogus voting

घटना उघडकीस आल्यानंतर एटा जिल्ह्यातील नयागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वेळा मतदान करणाऱ्या व्यक्तीचे नाव खिरियाच्या पमरण गावचे राजन सिंह असे आहे. पोलिसांनी राजनला अटक केली आहे. 

सीईओंनी हे निर्देश दिले

1. मतदान पक्षाच्या सर्व सदस्यांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

2. यूपीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी उर्वरित टप्प्यांमध्ये प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये काय दाखवले आहे?

व्हिडिओमध्ये एक तरुण ईव्हीएमजवळ उभा आहे. या व्हिडिओमध्ये तो 8 वेळा मतदान केल्याचा दावा करत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे निवडणूक आयोगाला हे चुकीचे वाटत असेल तर काहीतरी कारवाई करावी, अन्यथा… भाजपची बूथ कमिटी ही खरे तर लूट कमिटी आहे, असेही लिहिले आहे.

समाजवादी पार्टीवर व्हिडीओ शेअर करताना सपानेही व्हिडीओ शेअर केला आहे ही घटना निश्चितच बूथ कॅप्चरिंग दर्शवते. निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. आरोपींवर योग्य ती कारवाई करावी. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here