हे आहेत स्वीकृत नगरसेवक तर यांना स्थायी समिती सदस्यपदी संधी 

0
बिज्जू प्रधाने आणि रोहिणी तडवळकर

सोलापूर,दि.२०: सोलापूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा आज झाली. १०२ सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. भाजपचे ८७ नगरसेवक आहेत. महापालिका सभागृहात जाण्याची संधी कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली होती. आज स्वीकृत नगरसेवक म्हणून आठ जणांना भाजपने संधी दिली आहे. 

 

स्वीकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पक्षाच्या ८ तर ऑल इंडिया मजलिस ए इतहादुल मुसलमीन (AIMIM) पक्षाच्या एका सदस्याची वर्णी लागली. नियमानुसार सोलापूर महानगरपालिकेत दहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करता येते. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८७ जागांवर विजय मिळाल्यामुळे भाजपाच्या वाट्याला ९ तर ८ जागांवर विजय मिळवल्यामुळे एमआयएमच्या वाट्याला एक जागा येणे अपेक्षित होते. त्यानुसार या निवडी करण्यात आल्या.

भाजपाचे आठ स्वीकृत नगरसेवक

१) रोहिणी तडवळकर

२) अक्षय अंजिखाने

३) मनिष केत

४) वृषाली चालुक्य

५) श्रीनिवास दायमा

६) रुद्रेश बोरामणी

७) ऋषिकेश म्हेत्रे

८) ज्ञानेश्वर म्याकल

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी भाजपचे १४ तर शिवसेना आणि एमआयएम पक्षाचे प्रत्येकी एक सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्थायी समिती सदस्यांची नावे वाचून दाखवली. यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी या यादीस मंजुरी दिली.

स्थायी समिती सदस्य 

१) बिज्जू प्रधाने (भाजप)

२) सतीश सिरसिल्ला (भाजप)

३) रंजिता चाकोते (भाजप)

४) अविनाश पाटील (भाजप)

५) गणेश वानकर (भाजप)

६) भारतसिंग बडूरवाले (भाजप)

७) सत्यनारायण गुर्रम (भाजप)

८) अश्विनी चव्हाण (भाजप)

९) संगीता जाधव (भाजप)

१०) जयकुमार माने (भाजप)

११) शिवाजी वाघमोडे (भाजप)

१२) कल्पना कदम (भाजप)

१३) राजकुमार पाटील (भाजप)

१४) अमर पुदाले (भाजप)

१५) अमोल शिंदे (शिवसेना)

१६) अजहर हुंडेकरी (एमआयएम)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here