BJP-Shivsena: चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानानंतर शिंदे गटाच्या आमदाराने स्पष्टपणे सांगितले…

0

मुंबई,दि.18: BJP-Shivsena: 2024 च्या निवडणुकीत आपल्या जागा शंभर टक्के ज्या काही 150-170 येतील. पण आपण 240 जागा लढवण्याच्या विचारात आहोत. कारण शिंदेच्या शिवसेनेकडे 50 जागा आहेत. त्यावरती त्यांच्याकडे कुणी नाही. असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत वक्तव्य केले होते. चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. बावनकुळे यांनी आपल्या विधानावर सारवासारवही केली.

बावनकुळे यांच्या विधानानंतर ठाकरे गट आणि विरोधकांकडून हेच सत्य असल्याचं म्हटलं जातंय. त्यावरुन, आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी कुणी काहीही बोलेल, पण आम्ही किती जागा घेणार हे आकड्यासह सांगितलंय. 

हेही वाचा BJP On Maharashtra Politics: चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने शिंदे गटाबाबत चर्चेला उधाण

जागावाटपाबाबत कोणतेही सुत्र ठरले नाही | BJP-Shivsena

भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत कोणतेही सुत्र ठरले नसल्याचे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. तर, सोशल मीडियावरुन बावनकुळे यांचा तो व्हिडिओही हटविण्यात आलाय. मात्र, हीच शिंदे गटाची लायकी असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर, जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनीही या मुद्द्यावरुन शिंदे गटाला टोला लगावलाय. त्यामुळे, आता शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना 125 ते 130 जागा लढवणार असल्याचं म्हटलं. 

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आमची | MLA Sanjay Gaikwad

कोण कुठला नेता काय म्हणतो त्याला काही महत्व नाही. आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130 जागा लढवणार असल्याचं वक्तव्य शिवसेना आमदार (शिंदे गट) संजय गायकवाड यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आमची आहे. ही शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यामुळे कोण कुठला नेता काही घोषणा करत असेल तर त्याला काही महत्त्व नाही. आमची युती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांसोबतचा विषय आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही 125 ते 130 जागा लढवणार आहोत, असा आकडाच गायकवाड यांनी सांगून टाकला. 

दरम्यान, भाजप आमच्यापेक्षा मोठा पक्ष असल्यामुळे निश्चितच आमच्यापेक्षा थोड्याफार जागा ते जास्त लढतील. पण आम्ही शिवसेना म्हणून 125 ते 130 च्या खाली जागा लढणार नसल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या पोटात एक आणि ओठात एक असे असते. बाहेर बोलताना ते एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन जाण्याची भाषा बोलतात. पण बैठकीतील चर्चेत मात्र ते खरे बोलले. 48-50 जागा ते शिंदे यांना देतील आणि 240 जागा स्वत: लढवतील. पण शिंदे यांना दिलेल्या जागांपैकी पाडणार किती ते खासगीत सांगतील. जाहीरपणे सांगणार नाहीत असा टोलाही लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here